शिक्षकाने दाखवली लहान विद्यार्थीनीला पोर्न फिल्म

औरंगाबाद : लहान विद्यार्थीनीला स्वत:च्या मोबाईलवर पोर्न फिल्म दाखवण्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीच्या पालकांनी दामिनी पथकाकडे या प्रकाराची तक्रार केली आहे.
आपल्यता केबीनमध्ये बोलावून या मुलीशी चावट संवाद साधत या शिक्षकाने तिला पोर्न फिल्म दाखवली. त्यावेळी त्याने आक्षेपार्ह कृत्य केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा प्रकार सहा जानेवारीला घडला. मात्र या शिक्षकाने हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून ही मुलगी बोलली नाही. त्याने अशा पध्दतीने अनेक मुलींशी आक्षेपार्ह वर्तन केले असल्याचा आरोप होत आहे.
या मुलींच्या पालकांपैकी एकाने दामिनी पथकाला पत्र पाठवून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांना कळवल्यानंतर मुलींच्या पालकांनी याबाबतचे मौन सोडले. पोलिसांनी गेल्या आठवड्यात शाळेला भेट देऊन प्राथमिक तपास सुरू केला. त्यांनी मुलींचे जबाबही नोंदवले. सुरवातीला या प्रकरणात पालक काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सुरवातीला गुन्हा नोंदवला नव्हता.
मात्र, त्यानंतर हा प्रकार वाऱ्याच्या वेगाने सर्व पालकांमंध्ये पसरला. त्यानंतर त्या शिक्षकाविरोधात पोस्कोकायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 354 ड नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याल अटक करण्यात आली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.





