बीजिंग – चीन सरकारने चीनमधील नागरी विमान वाहतूक कंपन्यांना अमेरिकेच्या बोईन कंपनीकडून विमाने घेण्यास मज्जाव केला असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसापासून वृत्त माध्यमात पसरले आहे. मात्र चीनच्या प्रवक्तयाने असा काही निर्णय झाला नसल्याचे नमूद केले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार प्रवक्त्याने यासंदर्भात सांगितले की, चीन सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात आले आहे. मात्र मला या संदर्भात कसलीही माहिती नाही. दरम्यान चीनने बोईंग विमान खरेदी थांबवल्यानंतर आणि काही धातूची निर्यात अमेरिकेला थांबविल्यानंतर अमेरिकन सरकारने चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अगोदर हे आयात शुल्क 145% होते. त्यानंतर चीन सरकारने इतके शुल्क आकारणे हास्यास्पद असल्याचे सांगितले होते. अमेरिकेने यानंतर आयात शुल्क वाढविल्यास चीन सरकार त्याला प्रतिसाद देणार नाही. कारण अशा आकडेवारीला काही अर्थ राहणार नाही असे सांगितले होते. अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिका -चीनसह कोणाचेच भले होणार नाही, या भूमिकेचा प्रवक्तयाने पुनरुच्चार केला. आम्हाला व्यापारात संघर्ष नको आहे. मात्र कोणी एकतर्फी निर्णय घेत असल्यास आम्ही शांत राहणार नाही असे प्रवक्ता म्हणाला. दरम्यान चीन सरकारने बोईंग खरेदी थांबविण्याच्या कथेत निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारचा निर्णय घेणे चुकीचे आहे असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. चिनी सरकार अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यावरही मज्जा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेतकर्यांना त्रास होईल. मात्र अमेरिका अमेरिकन शेतकर्यांना मदत करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारताला चीनच्या निर्णयाचा फायदा दरम्यान चिनी कंपन्यांनी साधारणपणे 200 विमानाची ऑर्डर बोईंग कंपनीला दिलेली आहे. तर त्यापेक्षा कितीतरी जास्त विमानाची ऑर्डर भारतीय कंपन्यांनी बोईंग कंपनीला दिलेली आहे. त्यामुळे जर चीन ही विमाने घेणार नसेल तर भारतीय नागरी विमान वाहतूक कंपन्यांना ही विमाने लवकर मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर चीनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेने स्वीकारल्या नाहीत तर भारतीय वस्तू अमेरिकेला जाण्याची शक्यता वाढली आहे.