तारक मेहताच्या एका एपिसोडसाठी ‘एकमेव सेक्रेटरी’ आकारतात ‘इतके’ मानधन; आकडा ऐकून बसेल धक्का.!

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ‘जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे’ हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपापली भूमिका साकारण्यासाठी हे कलाकार एका एपिसोडसाठी हजारो रुपये आकारतात.
दरम्यान, ‘तारक मेहता’ मालिकेतील एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ‘मंदार चांदवडकर’ यांच्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदार चांदवडकर एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये आकारतात.
View this post on Instagram
त्यांचं हे मानधन जेठालाल ही भूमिका साकारत असलेल्या दिलीप जोशी यांच्या मानधनापेक्षाही जास्त आहे. एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे म्हणजेच, ‘मंदार चांदवडकर’ यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा असून, ते आपल्या सहज सुंदर अभियाने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. सोशल मदिड्यावर देखील त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असत.





