Tanu Weds Man 3: ‘तनु वेड्स मनु’चा तिसरा भाग येणार; कंगणा-आर. माधवनची जोडी पुन्हा पाहायला मिळणार
Tanu Weds Man 3: तिसऱ्या भागात कंगना पुन्हा एकापेक्षा जास्त भूमिकांमध्ये दिसणार का?

Tanu Weds Man 3: ‘तनु वेड्स मनु‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला. गेल्या अनेक वर्षांपासून चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘तनु वेड्स मनु’च्या तिसऱ्या भागाचे नाव ‘तनु वेड्स मनु: द नेक्स्ट चॅप्टर’ असल्याचे सांगितले जात आहे. ‘इरोस इनोव्हेशन्स’ने (Eros Innovations) नुकतीच त्यांच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली, ज्यामध्ये या बहुप्रतिक्षित चित्रपटाचाही समावेश आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिताक्षरा कुमार करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी ‘हीरामंडी’ आणि ‘द एम्पायर’ सारख्या भव्य वेब सीरिजसाठी काम केले आहे. या प्रोजेक्टची निर्मिती ‘रुद्रक सोमा ज्योती लिमिटेड’च्या सहकार्याने केली जाणार आहे. निर्मात्यांनी अद्याप शूटिंगचे वेळापत्रक जाहीर केले नसले, तरी पुढील वर्षात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल अशी अपेक्षा आहे. (Tanu Weds Man 3 )
कंगना-माधवनच्या जोडीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक (Tanu Weds Man 3)
‘तनु’ आणि ‘मनु’च्या भूमिकेत पुन्हा एकदा कंगना आणि आर. माधवन परतणार आहेत. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळेच पहिल्या दोन्ही चित्रपटांना अभूतपूर्व यश मिळाले होते. या दोन्ही पात्रांनी आधुनिक हिंदी रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात एक वेगळीच जागा निर्माण केली.
दरम्यान, या चित्रपटाच्या कथेबाबत निर्मात्यांनी सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु कंगनाच्या भूमिकेवरून आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत. ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्ये कंगनाने तनु आणि कुसुम सांगवान (दत्तो) अशी दुहेरी भूमिका साकारली होती. (Tanu Weds Man 3)
आता तिसऱ्या भागात कंगना एकापेक्षा जास्त भूमिकांमध्ये दिसणार का, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाने कंगना आणि आर. माधवन यांना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक बनवले. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही प्रेक्षकांना मोठी अपेक्षा आहे. ( Tanu Weds Man 3)
कंगनाने ‘ तन्नू वेड्स मन्नू’, ‘रिव्हॉल्वर रानी’, ‘उंगली’, ‘कट्टी बट्टी’, ‘रंगून’, ‘सिमरन’, ‘मणिकर्णिका: झाँसी की रानी’, ‘जजमेंटल है क्या’, ‘पंगा’, ‘थलायवी’, ‘धाकड’, ‘चंद्रमुखी २’ आणि ‘तेजस’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
हेही वाचा:






