R. Madhavan : ‘धुरंधर २’ची क्रेझ ! आर. माधवनने थिएटरमध्ये जाऊन पाहायला स्वत:चा चित्रपट
R. Madhavan : १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.

R. Madhavan : अलीकडे थिएटरमध्ये सिनेमा सुरू असताना त्यामध्ये काम करणारे कलाकार प्रेक्षकांना अचानक भेट देत सुखद धक्का देतात. मात्र अभिनेता आर. माधवनने थिएटरमध्ये जाऊन स्वत:चाच चित्रपट पाहिला. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’मध्ये आर. माधवनने अजय संन्याल ही भूमिका साकारली आहे.
या सिनेमातील त्याच्या भूमिकेची आणि त्याच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आर. माधवनबरोबरच या सिनेमामध्ये रणवीर सिंह, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले. यादरम्यान आता आर. माधवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, स्क्रीनवर धुरंधर २ या सिनेमातील सीन पाहायला मिळत आहे. अक्षय राठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट् करत आर. माधवनचे कौतुक केले आहे.
ही पोस्ट करुन तो चाहता कॅप्शनमध्ये लिहितो की, ”ISI तुम्ही काहीही प्लॅन बनवा. आम्ही तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की, अजय सन्याल यांची नजर प्रत्येक क्षण तुमच्यावर आहे. आर. माधवनसोबत पुन्हा एकदा ‘धुरंधर २’ बघायला मजा आली.”, असं लिहित त्या चाहत्याने माधवनचा फोटोही पोस्ट केला आहे.
सध्या आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहे. R. Madhavan
हेही वाचा:
Akshardham Temple New Jersey: अमेरिकेतील भव्य अक्षरधाम मंदिर वादात; मजुरांच्या शोषणाचे गंभीर आरोप





