“तुमच्याशिवाय आम्ही कसे जगणार?” सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट

R Madhavan Emotional Post | दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनीशी संबंधित आरोग्याच्या समस्यांनी ते त्रस्त होते आणि हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. सर्वांना हसवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
विनोदी अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने सर्वच सहकलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेता आर माधवनेही सतीश शाह यांच्यासोबत काम केलं होतं. आता त्याने भावुक पोस्ट लिहिली आहे. “आता स्वर्गात उत्साहाचं आणि आनंदी वातावरण असेल. सतीश जी, देव त्याच्या स्वत:च्याच निर्मितीचं कौतुक करुन हसतो. माझ्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात त्यासाठी तुमचे खूप आभार. माझ्यावरचा तुमचा विश्वास अढळ होता आणि तुम्ही मला सतत प्रोत्साहन देत राहिलात. R Madhavan Emotional Post |
View this post on Instagram
तुमची खूप आठवण येईल. सतीश जी तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्याशिवाय आम्ही कसे जगणार? ओम शांती” सोबतच आर माधवनने सतीश शाह यांच्यासोबतच्या आठवणीतला फोटो शेअर केला आहे. यामध्ये मंदिरा बेदीही दिसत आहे.
आर माधवनने सतीश शाह यांच्यासोबत ‘घर जमाई’ या विनोदी मालिकेत काम केले होते. सतीश शाह यांनी यामध्ये विश्वंभर मेहराची, तर आर माधवन एम सुब्रमणियमची भूमिका केली होती. मंदिरा बेदीही मालिकेत होती. अभिनेते असरानी देखील या मालिकेचा भाग होते. मात्र त्यांचे देखील काही दिवसांपूर्वीच निधन झालं. यातच आता सतीश शाह यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. R Madhavan Emotional Post |
हेही वाचा :





