Raj Bhavan in Tamil Nadu : तमिळनाडूत राजभवनावर फेकला पेट्रोल बॉम्ब; एका व्यक्तीला घेतले ताब्यात
Updated On:

Tamil Nadu – तमिळनाडूत (Tamil Nadu) चेन्नई येथे राजभवनाच्या (Raj Bhavan) बाहेर पेट्रोल बॉम्ब (Petrol bomb) फेकला जाण्याची एक गंभीर घटना घडली असून यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
कारूक्का विनोद असे त्याचे नाव असून त्याची चौकशी केली जाते आहे. तमिळनाडू विधानसभेत काही महिन्यांपूर्वी नीट विरोधी विधेयक संमत झाले होते.
तथापि, राज्यपाल आर. एन. रवी यांनी अद्याप त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. त्याचा निषेध म्हणून विनोद याने अगोदर राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि नंतर बॉम्ब फेकला.





