Tamil Nadu-keral rainfall : केरळ-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Tamil Nadu-keral Rainfall : तामिळनाडू आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. या पावसामुळे तमिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दरड कोसळून वाहतूकही विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून दोन्ही राज्यात अर्लट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाचा इशारा आणि राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, निलगिरी डीएमने पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आज निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर-मेट्टुपालयम राष्ट्रीय महामार्ग आणि कोठागिरी-मेटुपलायम महामार्गावर किमान 10 ठिकाणी वाहतूक कोलमडली आहे.
चेन्नईच्या प्रादेशिक हवामान विभागाने, पुढील तीन दिवस तामिळनाडू आणि पुद्दुचेरी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला. चेंगलपट्टू, कोईम्बतूर, कुन्नूर, कोठागिरी आणि थुथुकुडीसह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. अनेक भागात पाणी साचल्याचेही वृत्त आहे. चेन्नई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक बालचंद्रन म्हणाले, ‘पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे जेथे तामिळनाडू आणि पाँडेचेरीचा संबंध आहे.’
केरळच्या इडुक्की आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलन आणि ढिगारा कोसळला, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आणि अनेक गावे आणि शहरे उर्वरित प्रदेशापासून तुटली आहेत. अधिका-यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाने पठाणमथिट्टासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे,





