Tamhini Ghat : ताम्हिणीजवळ दरड कोसळली; 3 घरे मातीखाली, सुदैवाने जीवितहानी टळली
मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हिणी (Tamhini Ghat) परिसरातील निवे ग्रामपंचायतीअंतर्गत सारोळे–दावडी (महसुले गाव, निवे) येथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

Tamhini Ghat : मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हिणी (Tamhini Ghat) परिसरातील निवे ग्रामपंचायतीअंतर्गत सारोळे–दावडी (महसुले गाव, निवे) येथे डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात स्लाइडिंग (Tamhini Ghat) झाले. दरड कोसळलेल्या ठिकाणाच्या डोंगराच्या खाली काही झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, अतिवृष्टीमुळे धोका लक्षात घेऊन तेथील रहिवाशांनी यापूर्वीच सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते.
दरड कोसळल्यानंतर रस्त्याच्या खालच्या बाजूस असलेली घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेली तीन घरे मातीखाली दबली. ही घरे रिकामी असल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच एमएसआरडीसीच्या पथकांनी (Tamhini Ghat) घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली असता कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजत आहे. पावसाचा जोर कायम असून त्याठिकाणी मदत कार्य मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर मदत कार्य सुरु होईल नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करून सुचनेचे पालन करावे
– विजयकुमार चोबे, तहसीलदार मुळशी





