Varandha Ghat : वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग!
वरंधा घाट (Varandha Ghat) परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरडी कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ ऑगस्ट पर्यंत घाटरस्ता बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केले आहे.
Updated On:

Varandha Ghat : राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट (Varandha Ghat) परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरडी कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ ऑगस्ट पर्यंत घाटरस्ता (Varandha Ghat) बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केले आहे.






