तमन्नाने ब्रेकअपनंतर ‘विजय’चे नाव ऐकताच दिली हटके रिअॅक्शन; व्हिडिओ व्हायरल

Tamannaah Bhatia | अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या ब्रेकअप झाले आहे. यादरम्यान तमन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या तमन्ना भाटिया ‘ओडेला 2’च्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र यावेळी ‘विजय’चे नाव ऐकताच ती लाजल्याचे पाहायला मिळाले.
‘ओडेला २’च्या प्रमोशनला एका पापाराझीने तमन्नाला विचारले की, “तुमच्या आयुष्यात असा कोण व्यक्तिमत्व आहे. ज्याच्यावर तंत्र-मंत्राचा वापर करून तुम्ही विजय प्राप्त करू इच्छिता?” या प्रश्नातून विजयचा अप्रत्यक्ष उल्लेख झाला. ‘विजय’ शब्द ऐकताच तमन्ना भाटियाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती लाजत लाजत हसली. तसेच मोठा आरडाओरडा देखील करण्यात आला.
View this post on Instagram
पापाराझीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत तमन्ना म्हणाली, “मी तुमच्यावरच नियंत्रण मिळवू इच्छिते. तुम्हाला वशमध्ये केल्यावर सर्व पापाराझी माझ्या मुठीत असतील. तर मग करूया का?” याद्वारे तमन्नाने पापाराझीची फिरकी घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी 2022 पासून जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले पण आता दोघे वेगळे झाले आहेत. सियासत डेलीच्या रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय यांच्यात अंतर आले कारण लग्नाबाबत दोघांची विचारसरणी वेगळी होती. यावरून दोघांमध्ये मतभेद झाल्याचे म्हंटले जाते.
हेही वाचा :
श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात झेब्रा रेडियमवाल्यांकडून लुट; वाहनधारक त्रस्त





