मुंबई – मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित’. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
चित्रपट, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. तेजस्वीनी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून तेजस्वीनी नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या तेजस्विनी पंडितनं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. नुकतंच तेजस्विनी पंडितनं इंस्टाग्रावर काही हॉट फोटो शेअर केले असून, तिच्या फोटोंवर लाईक्स अक्षरशः वर्षाव झाला आहे.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तेजस्विनीने काळ्या रंगाची सिल्की साडी घातली आहे. या साडीत ती अतिशय मनमोहक आणि मादक दिसत आहे. तिच्या फोटोंवर मराठी चित्रपटसृष्टी मधील अनेक बड्या कलाकारांनी कमेंटचा वर्षाव केला.