Ravi Rana | महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातील राजभवनात रविवारी संपन्न झाला. यावेळी ३९ आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. भाजपकडून १९, शिवसेनेकडून ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात २५ नवे चेहरे आहेत. मात्र मंत्रीपद न मिळाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनसुराज्य पक्ष, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाला मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु महायुती सरकार मंत्रिमंडळात छोट्या पक्षांना स्थान मिळाले नसल्याचे पहायला मिळाले. रवी राणा नाराज होऊन अमरावतीत परतले स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण त्यांनाही संधी मिळाली नाही. त्यादरम्यान हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात होत असतानाच रवी राणा नागपूर सोडून अमरावतीला निघून गेले. नव्या सरकारमध्ये त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे रवी राणा नाराज असल्याची चर्चा असून अचानक ते रात्रीतच नागपूर सोडून अमरावतीला निघून गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. Ravi Rana | मंत्रिपदाची पाटी कोरीच महायुती सरकारच्या दोन्ही कार्यकाळात जिल्ह्यात मंत्रिपदाची पाटी कोरीच आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात यावेळी प्रथमच आठ पैकी सात जागांवर महायुतीचे आमदार आहेत. यात भाजपचे पाच आमदार जिल्ह्यात असले तरी एकही मंत्रीपद न दिल्याने राणा दाम्पत्य कमालीचे नाराज असल्याचे म्हंटले जात आहे. महायुतीच्या नेत्यांची नाराजी तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते देखील काल राजभवनात फिरकले नाहीत. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे पूर्व नागपूरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यांनी भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय घेतला. Ravi Rana | तर जळगाव जामोद मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले तरी भाजप नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवला आहे. यावर आता फडणवीस नेत्यांची नाराजी दुर करणार का? पहावे लागणार आहे. हेही वाचा: अमित शाह यांनी पहिल्यांदाच लॉरेन्स बिश्नोईवर दिली प्रतिक्रिया ; ट्रूडो सरकारकडेही मागितले ‘हे’ पुरावे