तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात- निर्यातीवर घातली बंदी

काबुल – 20 वर्षांच्या अवधीनंतर अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा करण्यात तालिबानी यशस्वी ठरले असून त्यांनी आता राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. तालिबान्यांनी अफगाणी अध्यक्षांच्या प्रासादावरही कब्जा केला असून आता देशातील युद्ध संपले असल्याचीही घोषणा त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानचे अध्यक्षच देश सोडून पळून गेले आहेत. इतक्या अल्पावधीत तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा करतील असे कोणालाही वाटले नव्हते. 9 जुलैला तालिबान्यांनी त्या राज्यातील महत्त्वाचे प्रांत काबीज करण्यास सुरुवात केली आणि जेमतेम सव्वा महिन्यात ते काबूलपर्यंत पोहोचलेसुद्धा.
तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे भारत तालिबानसंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्थान आणि भारताचे अर्थ संकल्प कसे असतील या कडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.
या अर्थ संबंधाबाबत भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी माहिती दिली आहे की,’ या पूर्वो अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे वस्तूंची ये जा होत असे मात्र यावर आता तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. तालिबान्यांनी वाहतूक मार्गावर बंदी घातल्यामुळे आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान आयात आणि निर्यातीमध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अनेक खाद्य पदार्थांचा समावेश आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. दर दुसरीकडे अफगाणिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सुकामेव्याचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही देशांना याचा आर्थिक लाभ होतो म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत आर्थिक सल्लागारांचे आहे.





