Taliban Brutality – अफगाणिस्तानात तालिबानने सशस्त्र सत्तांतरण घडवून आणलं. देशात पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आल्याने येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी तालिबान्यांची क्रूरता अनुभवलेले लोक कोणत्याही मार्गाने देश सोडून पलायन करण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर येथील महिला भयभीत असल्याचं समोर येत आहे.
तालिबानचे नेते आपण नव्या विचारांसह सत्तेत आलो आहोत, महिलांना आपल्याकडून कोणताही धोका नाही. असं उर बडवून सांगत आहेत. मात्र अफगाणिस्तान पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या एका महिला पोलिसाने तालिबानचा क्रूर चेहरा बेनकाब केला आहे. Taliban Brutality
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालिबानने खतिरा नामक एका महिला पोलीसाचे दोन्ही डोळे काढून तिला सहा गोळ्या घातल्या. खतिरा या गजनी शहरामध्ये बंदोबस्तासाठी तैनात असताना तालिबान्यांनी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रतिकार केला या रागातून तालिबान्यांनी हे कृत्य केलं.
लायकी दाखवलीच! तालिबान्यांची बंद भारतीय दूतावासात घुसून तोडफोड; गाड्या, कागदपत्रे…
मात्र तालिबानच्या या क्रूर कृत्यानंतर देखील दैव बलवत्तर म्हणून ही महिला यातून बचावली. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात खतिरा यांचे दोन्ही डोळे निकामी झाले. सध्या खतिरा या भारतामध्ये डोळ्यांचे उपचार घेत आहेत. Taliban Brutality
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान्यांनी सत्ता आल्याने खतिरा व त्यांचे कुटुंबीय सध्या भीतीच्या सावटामध्ये आहेत. सत्तेत आल्यानंतर आधीच्या सरकारच्या काळामध्ये खतिरा व त्यांच्यासारख्या पोलीस व लष्करामध्ये काम करणाऱ्यांवर तालिबान लक्ष ठेऊन आहे. आपल्या घराची देखील वारंवार झाडाझडती घेतली जात असल्याचं खतिरा सांगतात.
खतिरा या सध्या भारतामध्ये डोळ्याचे उपचार घेत असून त्यांच्याबरोबर त्यांचे पती व लहान मुलगा आहे. त्यांची तीन मुलं गजनी येथे असून त्यांची काळजी वाटत असल्याचं खतिरा सांगतात. Taliban Brutality