Mallikarjun Kharge: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा कॉंग्रेसकडून तीव्र निषेध; मानवतेविरुद्धचे कृत्य असल्याची मल्लिकार्जुन खर्गेंची प्रतिक्रिया
Mallikarjun Kharge: मानवी हक्कांच्या अशा क्रूर उल्लंघनाचा जगभरातून निषेध झाला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.

Mallikarjun Kharge: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या भीषण हवाई हल्ल्याचा काँग्रेसने मंगळवारी तीव्र निषेध केला आहे.
या हल्ल्यात सुमारे ४०० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, मानवी हक्कांच्या अशा क्रूर उल्लंघनाचा जगभरातून निषेध झाला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले दुःख व्यक्त Mallikarjun Kharge
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, ‘काबूलमधील अमली पदार्थमुक्ती केंद्रावर (रुग्णालय) झालेल्या हवाई हल्ल्यातील जीवितहानीमुळे आम्ही व्यथित झालो आहोत. मानवतेविरुद्धच्या अशा कृत्यांचा आम्ही निषेध करतो.
या कठीण काळात भारत आपल्या अफगाण बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’ तसेच भारताचे अफगाणिस्तानशी असलेले ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित करताना खर्गे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. Mallikarjun Kharge:
अफगाण सरकारचे प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाची इमारत मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहे. Mallikarjun Kharge
मृतांचा आकडा ४०० वर पोहोचला असून २५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बचाव पथके सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे काम करत आहेत.
हेही वाचा :






