लायकी दाखवलीच! तालिबान्यांची बंद भारतीय दूतावासात घुसून तोडफोड; गाड्या, कागदपत्रे…

Taliban loots Indian consulates – तालिबान्यांनी तब्बल २० वर्षांनंतर अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे. देशाची सत्ता पुन्हा एकदा तालिबान्यांनी हाती गेल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालिबानी महिलांवर अत्याचार करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
तालिबान्यांच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महिला विमानतळावर याचना करतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तालिबान्यांच्या दहशतीची प्रचिती येते. तालिबान्यांनी मात्र आम्ही नव्या विचारांसह सत्तेत आलो आहोत, महिलांनी घाबरण्याचे कारण नाही, त्यांच्या अधिकारांचा सन्मान करण्यात येईल असं म्हंटल होत.
तालिबान्यांचे शब्द व कृती यांमध्ये मोठी तफावत असल्याचं दिसतंय. तालिबानतर्फे कालच भारताशी संपर्क साधण्यात आला होता. यावेळी तालिबानने काबुल येथील आपले दूतावास कार्यालय बंद करू नका असं म्हंटल होत. तालिबानच्या कतार कार्यालयातून याबाबत संपर्क साधण्यात आला होता. मात्र तालिबानने दिलेल्या शब्दाला एक दिवसही उलटत नाही तोपर्यंतच त्यांनी त्याचं उल्लंघन केलं आहे.
अफगाणिस्तानातील कंदहार व हेरत शहरांमध्ये असलेल्या वाणिज्य दूतावासामध्ये तालिबान्यांनी लूट माजवली आहे. याबाबतची माहिती सरकारी सुत्रांकरवी देण्यात आली. तालिबान्यांनी कंदहार व हेरत शहरांमध्ये असलेल्या वाणिज्य दूतावासामध्ये घुसून येथील कागदपत्रांची शोधाशोध केली. येथे लावण्यात आलेल्या गाड्या पळवून नेल्या, असं सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. Taliban loots Indian consulates
“तालिबानी अशा प्रकारचे कृत्य करतील याची आम्हाला खात्री होतीच. त्यांच्या या कृतीमुळे तालिबानी नेते देत असलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.” अशी प्रतिक्रिया भारत सरकारमधील सूत्रांनी दिली.
दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केल्यानंतर भारताने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी परत आणलं आहे. भारतीय वायुदलाने हे रेस्क्यू ऑपरेशन १६ व १७ तारखेला पार पाडलं. Taliban loots Indian consulates





