Talegaon Dabhade: निवडणूक आचारसंहितेमुळे नगरपरिषदेची सभा पुन्हा स्थगित
Talegaon Dabhade: २३ सप्टेंबरची सर्वसाधारण सभा दुसऱ्यांदा पुढे ढकलली

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आज (दि. २३) होणारी सर्वसाधारण सभा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिली.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २२ सप्टेंबरपासून संबंधित निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणूक कालावधीत आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेली नगरपरिषदेची २३ सप्टेंबरची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर ९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने घेण्यात आला असल्याचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सांगितले.
Pimpri-Chinchwad: पाणीपुरवठ्यासाठी २२० कोटींच्या कामांना मंजुरी; अंदाजपत्रक समितीची मान्यता





