Shirur News : टाकळी हाजी आऊट पोस्टमध्ये अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा; शिरूरच्या बेट भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, नागरिकांचा तीव्र संताप
Shirur News : शिरूर तालुक्यातील 'बेट भाग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात पुन्हा एकदा अवैध व्यवसायांनी आणि व्यसनाधीनतेने भीषण रूप धारण केले आहे.

Shirur News : शिरूर तालुक्यासह बेट भागात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. दारू, जुगार, मटका, नशीले पान आणि ड्रग्ज व्यवसायाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Shirur News)
पोलिसांकडून अधूनमधून थातूर मातूर कारवाई होत असली तरी त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसून येत नसल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये पोलिसांची भीती उरली नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ढाब्यात दारुविक्री होते अन् दाखल होताना मात्र ढाब्याच्या आडोशाला विक्री होते असे दाखवले जाते. तसेच मालकाला सोडून वेटरवर गुन्हा दाखल केला जातो. (Shirur News)
टाकळी हाजी आउटपोस्टमध्ये दोन अधिकारी दिलेले असून ते बऱ्याचदा शिरूर येथेच असतात. बऱ्याचदा पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने कामकाजासाठी नागरिकांना शिरूर पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते. (Shirur News)
त्यामुळे टाकळी हाजी आऊट पोस्टमध्ये अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. याप्रकरणी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिरूर तालुक्यासह बेट भागातील परिसरातील जवळपास सर्व धाब्यांवर नियमांना हरताळ फासत मद्यविक्री सुरू असल्याचे आरोप होत आहेत. (Shirur News)
ग्रामीण भागातील तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत असताना संबंधित यंत्रणा मात्र केवळ कागदी कारवायांपुरती मर्यादित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसणार की केवळ दिखाऊ कारवाया सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shirur News)
दरम्यान, टाकळी हाजी दूरक्षेत्रात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत आणि गोविंद खटींग यांच्यासमोर अवैध धंद्यांबरोबरच गुन्हेवारी व वारंवार होण्याऱ्या चोऱ्यांवरअंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे अधिकारी कठोर भूमिका घेऊन कारवाई करणार की परिस्थिती जैसे थे राहणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. (Shirur News)





