Welcome to the Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक सोमवारी रिलीज झाले आहे. खास म्हणजे गाण्याची सुरुवात पहिल्या चित्रपटातील ‘आलू ले लो… कांदे ले लो’ या प्रसिद्ध डायलॉगने होते. या गाण्यानंतर ‘वेलकम टू द जंगल’ने या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता आणि इतर अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात तब्बल २५ कलाकार असून ते सर्वजण या गाण्यात पाहायला मिळत आहेत. एवढ्या मोठ्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट बॉलिवूडमधील कौटुंबिक मनोरंजक चित्रपटांपैकी एक मानला जात असून, चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांचं मन जिंकणारं आहे. US Iran War: ‘अमेरिकेनेच अंतिम मुदत ठरवली अन् स्वतःच पळ काढला”; इराणची खोचक टीका दरम्यान, हे मूळ टायटल ट्रॅक साजिद-वाजिद यांनी कंपोज केले होते, ज्याला आता विक्रम मोंट्रोसने एका नवीन आणि हाय-एनर्जी अंदाजात रीक्रिएट केले आहे. हे गाणे पूर्णपणे मस्ती आणि मनोरंजनाने भरलेले आहे. शान, प्रिया पाटीदार आणि विक्रम मोंट्रोस यांच्या दमदार आवाजाने गाणे अप्रतिम झाले आहे. हा अल्बम ‘वेलकम’ फ्रेंचायझीचा संगीतमय वारसा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पुढे नेतो. ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर या चित्रपटाचा टीझर १५ मे रोजी रिलीज करण्यात आला होता. यावरून समजते की, चित्रपटाची कथा एका बनावट चित्रपटाभोवती फिरते जी नंतर गडबड होते, आणि तिथून पुढे गोंधळ आणि विनोदाने भरलेली कथा पुढे जाते. अक्षय कुमार दुसऱ्या भागात नव्हता, आता या फ्रँचायझीमध्ये तो पुन्हा परतला आहे. यात त्याला आणि रवीना टंडनला एकत्र पाहायला मिळाल्याने चाहतेही उत्सुक आहे. दरम्यान, हा चित्रपट २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. Welcome to the Jungle हेही वाचा: Jackfruit: फणस ठरतोय सुपरफूड! चवदारच नाही तर आरोग्यासाठीही जबरदस्त फायदेशीर