Rohit Pawar: “विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर कारवाई करा आणि…”; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar: मुलाखतीदरम्यान विद्यानंद बापट यांना मारहाण

Rohit Pawar: गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. मात्र विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अचानक एका तरूणाने बापट यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Rohit Pawar)
यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर बापट यांना करण्यात आलेल्या मारहणीचा निषेध केला आहे. तसेच रोहित पवार यांनी विद्यानंद बापट यांना
पोलिस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 3, 2026
पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण (Rohit Pawar)
रोहित पवार यांनी पोस्ट करत लिहिले, “गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही.”
तसेच पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय घडलं?
विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. मात्र, त्याठिकाणी पोलीस आणि इतरजण उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यानंतर विद्यानंद बापट डगमगले नाहीत. त्यांनी या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांना शांतपणे प्रतिक्रिया देत, माझी भूमिका योग्य असून मी त्यावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा:





