अंकित शर्मा हत्याप्रकरणी ताहिर हुसेन फरार
Updated On:

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी दंगलखोरांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 123 एफआयआर नोंदवण्यात आले असून 630 लोकांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप असलेले ताहिर हुसेन फरार झाले आहे. पोलिसांनी शुक्रवारी ताहिर हुसेन यांच्या घरावर छापा टाकला होता.
अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी ताहिर हुसेन यांच्यावर खुनाचा आरोप केला आहे . दरम्यान दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसेन यांचे घर व कारखाना सील केला आहे. आम आदमी पक्षानेही त्यांना निलंबित केले.




