Tahir Hussain : दिल्ली दंगल प्रकरणी ताहिर हुसेनला जन्मठेप
देशाची राजधानी दिल्लीत वर्ष २०२० मध्ये उसळलेल्या दंगलींशी संबंधित एका प्रकरणाचा निकाल स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, आपचा पूर्वाश्रमीचा नेता आणि माजी नगरसेवक ताहिर हुसेन (Tahir Hussain) याच्यासह 5 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.

Tahir Hussain : देशाची राजधानी दिल्लीत वर्ष २०२० मध्ये उसळलेल्या दंगलींशी संबंधित एका प्रकरणाचा निकाल स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, आपचा पूर्वाश्रमीचा नेता आणि माजी नगरसेवक ताहिर हुसेन (Tahir Hussain) याच्यासह ५ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.
दंगलींवेळी गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्या प्रकरणी हुसेन (Tahir Hussain) आणि इतर चौघांना स्थानिक न्यायालयाने १३ जुलैला दोषी ठरवले. त्यांना कुठली शिक्षा द्यायची याविषयीची सुनावणी शुक्रवारी झाली. दोषींनी पाशवी स्तर गाठला. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आली.
मात्र, संबंधित प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ प्रकारात येत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य केली नाही. शिक्षा सुनावली जात असताना न्यायालयात हुसेन (Tahir Hussain) आणि त्याच्या कुटूंबातील सदस्य हजर होते. उच्च न्यायालय न्याय देईल, अशी प्रतिक्रिया हुसेन याने नंतर दिली. दिल्ली दंगलींमुळे संपूर्ण देश हादरला. त्यावेळी आयबी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे आणखीच सनसनाटी निर्माण झाली. त्या प्रकरणी आता स्थानिक न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.






