‘तारक मेहता का उलटा चश्मा’ फेम निधी भानुशाली झळकणार नव्या वेबसीरिजमध्ये

Actor Nidhi Bhanushali| ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका मागील काही काळापासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना या शो मुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली निधी भानूशाली एका नव्या वेब सीरिजमधून कमबॅक करणार आहे. यात ती एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आगामी सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे.
निधी भानूशालीने या ट्रेलरसोबत ”शाळेच्या दिवसातील आठवणी आणखी खास करण्यासाठी आलीय गर्ल गँग,” असे तिने कॅप्शन दिले आहे. निधी आणि तिच्या गर्ल गँगची ही सीरिज 13 जूनपासून Amazon Mini TV वर प्रसारित होणार आहे. यामध्ये निधी एका शालेय विद्यार्थिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Actor Nidhi Bhanushali|
View this post on Instagram
निधी भानुशाली वयाच्या 12 व्या वर्षी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत झळकली होती. निधीने झील मेहताला रिप्लेस केले. निधीने जवळपास 7 वर्ष सोनूची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 2019 मध्ये मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या मालिकेनंतर चाहते देखील तिच्या भूमिकेला खूप मिस करत होते. अखेर आता नव्या वेबसीरिजद्वारे ती पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. Actor Nidhi Bhanushali|
दरम्यान, निधी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यावरून अनेकदा तिला ट्रोल केले गेले.
हेही वाचा :





