अंकुश चौधरीने शेअर केले पोस्टर; नव्या प्रोजेक्टची रंगली चर्चा

Ankush Chaudhari New Project| मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मागील वर्षी तो ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात झळकला होता.
यात त्याने शाहीर साबळेंची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटानंतर आता अंकुश कोणत्या नव्या सिनेमात पाहायला याची सर्वांच उत्सुकता होती. यातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर अंकुशने एक रील शेअर केलं आहे. ज्यात ‘अंकुश चौधरी घेऊन येत आहे फॅन्टसी नाईट’ असं लिहिली होतं आणि त्यावर “Soon in Monsoon.PS: If #IndvsPak is the mother of all rivalries, ही पण सगळ्या फॅन्टसीची #AI आहे.” असं कॅप्शन अंकुशने दिले आहे. त्याच्या या पोस्टमुळे सगळेचजण कन्फ्युज झाले आहेत. कारण आता अंकुशचा हा सिनेमा आहे की वेब सिरीज हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर अनेकांनी हा रिअॅलिटी शो असल्याची देखील शंका उपस्थित केली आहे.
View this post on Instagram
पण याचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका निभावत आहे. त्याच्याबरोबर फुलवा खामकर आणि वैभव घुगेही या शोचं परीक्षण करत आहेत. त्याच्या या शोला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Ankush Chaudhari New Project|
हेही वाचा:





