‘मर जाओ उधर गंदे नाले में गिर के…’, सामना हरल्याने पाकिस्तानी चाहत्याला राग अनावर; पहा व्हिडिओ!

T20 WorldCup – पाकिस्तान संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानने सामना शेवटच्या चेंडूवर जमावाला होता. त्याचप्रमाणे झिम्बाब्वेविरुद्ध देखील संघाला शेवटच्या चेंडूवरच सामना गमवावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. दरम्यान पाकिस्तानच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर संघावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. त्यातच पाकिस्तानी चाहतेही संघावर चांगलेच संतापलेले दिसत आहेत.
केएल राहुलला बाहेर काढा अन् ऋषभ पंतला खेळावा, चाहत्यांची मागणी!
गुरुवारी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील मैदानावर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सुपर-१२ चा सामना खेळवण्यात आला होता. या रोमांचक सामन्यात पाकिस्तान संघाला एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर नाराज चाहत्यांनी चांगलाच राग काढला आहे. एका यूजरनेस्वतःचा व्हिडिओ बनवला आणि ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की, “जा आणि तिकडे एखाद्या नाल्यात पडून बुडून मरा, तुमच काहीही होऊ शकत नाही.”
Saloooo pic.twitter.com/ximbAhd8YI
— Ahsan Tariq (@AhsanKashmiri89) October 27, 2022
भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरनेही पाकिस्तनला डिवचले
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही पाकिस्तान संघाच्या पराभवाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. त्याने ट्विट करून लिहिले की, ‘झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवले. याला योगायोग असे म्हणू नका. झिम्बाब्वे संघासाठी ही अभिमानाची बाब असेल, कारण ते चांगले क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे ते आदर आणि कौतुक या दोन्हीसाठी पात्र आहेत.’ यासोबत जाफरने एक फोटोही शेअर केला आहे.
Zimbabwe beat Pakistan 🙌🏽
And do not call this an upset. It’d be disrespectful to @ZimCricketv who’ve played so well and deserve all the respect and praise. Pic unrelated 😛 #PAKvZIM #T20WorldCup pic.twitter.com/RDxKasz05p— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 27, 2022
झिम्बाब्वेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण शाहीन आफ्रिदीला केवळ एक धाव करता आली आणि पाकिस्तानच्या संघाने सामना गमावला. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील ( T20 WorldCup ) हा पाचवा उलटफेर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.
Zimbabwe win by one run in Perth.#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvZIM pic.twitter.com/LTXrN3HMcY
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2022





