Dasun Shanaka Ban : मोठी बातमी! राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूवर घातली बंदी, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Dasun Shanaka Ban : या कारवाईनंतर दासुन शनाकाने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे.

Dasun Shanaka PSL Ban 2027 : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने सॅम करनच्या जागी दासुन शनाका याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. राजस्थानची ही ऑफर स्वीकारण्यासाठी शनाकाने २१ मार्च २०२६ रोजी पीएसएलमधून एकतर्फी माघार घेतली. पीसीबीने या प्रकरणाची चौकशी केली असता, शनाकाचा हा निर्णय खेळाडू नोंदणी नियम आणि त्रिपक्षीय कराराचे उल्लंघन असल्याचे आढळून आले. यामुळे शनाकावर पीएसएल २०२७ मध्ये खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
शनाकाची माफी आणि स्पष्टीकरण –
🗣️ “I must clarify that at the time I withdrew from the PSL I had no intention of joining any other tournament.”
Dasun Shanaka has expressed regret over withdrawing from the PSL to join the IPL, with the PCB handing him a one-year ban instead of two.#PSL | #IPL |… pic.twitter.com/ybdZDZhK2t
— Cricketangon (@cricketangon) April 20, 2026
या कारवाईनंतर दासुन शनाकाने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे. तो म्हणाला, “पीएसएल सोडण्याच्या माझ्या निर्णयाचा मला पश्चात्ताप होत आहे. मी पाकिस्तानमधील जनता आणि लाहोर कलंदर्सच्या चाहत्यांची माफी मागतो. जेव्हा मी पीएसएल सोडली, तेव्हा माझा इतर कोणत्याही स्पर्धेत खेळण्याचा विचार नव्हता.” शनाकाने पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांबद्दल आदर व्यक्त केला असून, भविष्यात पुन्हा या लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पीसीबीचा कडक संदेश –
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, लीगची प्रतिष्ठा आणि कराराचे नियम पाळणे हे सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य आहे. पीसीबीचे व्यावसायिक मानक जपण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, इतर खेळाडूंनी कराराचा भंग करू नये, यासाठी हे एक उदाहरण असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळण्याची संधी मिळाली असली तरी, पाकिस्तानमधील ही बंदी शनाकाच्या फ्रँचायझी क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम करू शकते.





