T20 WorldCup – टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये शुक्रवारचा दिवस चाहत्यांसाठी खूपच खराब राहिला. कारण सुपर-१२ मधील खेळले जाणारे दोन रोमांचक सामने पावसामुळे रद्द करावे लागले. मेलबर्न येथील क्रिकेट ग्राउंडवर आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसरा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सामनाही पावसामुळे रद्दच करावा लागला. सामने रद्द होण्याची मालिका सुरूच असल्याने विश्वचषकाच्या सुपर-१२ मधील गट-१ च्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत.
“भारत पण काही…”, झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवल्यानंतर शोएब अख्तर खवळला
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्वाचा मानला जाणारा सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापले मत व्यक्त केले आहे. यजमान संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने म्हटले की,”संघातील सर्व खेळाडू हा सामना खेळण्यासाठी अत्यंत तयारीत होते. मात्र पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना न झाल्याने आम्ही निराश झाली आहे. पण आम्ही निश्चितच हताश झालेलो नाही. पावसामुळे मैदान ओले झाल्याने खेळाडूंना गंभीर दुखापती होण्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पंचांनी दोन्ही संघाशी बोलून हा निर्णय घेतला.”
इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध क्रिकेट खेळणे नेहमीच रोमंचाक असते. मी माझ्या कारकिर्दीतील शंभरावा सामना खेळू शकलो याचेही मनात दुःख आहेच. या सामन्यात आमच्या संघाने चांगली कामगिरी केली असती आणि सामनाही जिंकला आसता. मात्र आता आम्हाला स्पर्धेतील आव्हान टिकवणे आणखी कठीण बनले आहे. असे असले तरी आम्ही पुढील सामन्यात चांगली कामगिरी करू.”
शुक्रवारीचे दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याने चार संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. ग्रुप १ मध्ये नेट रन रेट चांगले असल्याने न्यूझीलंड ३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे 3 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर आयर्लंड 3 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ या यादीत चौथ्या स्थानावर आहे.