T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाच्या संभाव्य तारखा जाहीर, ‘या’ दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना

T20 World Cup 2026 Schedule Updates : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा टी-20 विश्वचषक 2026 फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. नवीन अहवालानुसार, ही मोठी स्पर्धा 7 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होऊ शकतो, तर अंतिम सामना 8 मार्च 2026 रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे.
अंतिम सामना कुठे होणार?
या स्पर्धेचे सामने भारतातील पाच आणि श्रीलंकेतील दोन मैदानांवर खेळवले जाणार आहेत. अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. हा निर्णय पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचतो की नाही यावर अवलंबून आहे. जर पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहोचला, तर फायनल कोलंबो येथे होईल; अन्यथा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हा सामना आयोजित करेल.
🚨 BIG UPDATE ON 2026 T20 WORLD CUP 🚨 (ESPNcricinfo)
– 20 Teams.
– 4 Groups.
– 5 Teams in every Group.
– India & Sri Lanka as host.
– Likely from February 6 to March 8
– Final at Narendra Modi Stadium or Colombo (If Pakistan Qualify). pic.twitter.com/CZLXWfkdBQ— Tanuj (@ImTanujSingh) September 9, 2025
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तान संघ भारतात येणार नाही, कारण भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात गेला नव्हता. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि सहभागी देशांना 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीबाबत माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : अफगाणिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टी-20 विश्वचषकाचे कसे असेल स्वरुप?
या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून, 2024 च्या टी-20 विश्वचषकाप्रमाणेच याचे स्वरूप असेल. 20 संघांना प्रत्येकी पाच संघांचे चार गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर चार-चार संघांचे दोन गट बनवले जातील, ज्यामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत 15 संघांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.





