T20 World Cup 2024 (SA vs AFG Semi-final 1) : विजय नव्हे पण अनुभव मिळाला – रशीद खान

T20 World Cup 2024 (SA vs AFG Semi-final 1) :- आमच्या संघासाठी हा एक आव्हानात्मक दिवस होता. आम्ही कदाचित चांगली कामगिरी करु शकलो असतो, पण परिस्थितीने आम्हाला हवे ते करू दिले नाही. टी-२० क्रिकेट हे असेच आहे, तुम्हाला सर्व परिस्थितींसाठी तयार असणे आवश्यक आहे. मला वाटते की दक्षिण आफ्रिकेने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, असे म्हणत राशिदने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे कौतुक केले.
राशिदने या पराभवानंतर आपल्या गोलंदाजांचीही पाठ थोपटली. मला वाटतं की या स्पर्धेत आम्हाला चांगले यश मिळाले, कारण वोगवान गोलंदाजांनी खरोखर चांगली कामगिरी केली. मुजीबच्या दुखापतीमुळे आम्ही दुर्दैवी ठरलो. पण आमचे गोलंदाज आणि अगदी मोहम्मद नबी यानेही नव्या चेंडूसह उल्लेखनीय गोलंदाजी केली. त्यामुळे फिरकीपटूंनी काम सोपे केले. आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला. आम्ही उपांत्य फेरीत खेळणे आणि आफ्रिकेसारख्या आघाडीच्या संघाकडून पराभूत झालो, हे स्वीकारतो, असं राशिदने नमूद केले.
आमच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे, आमच्याकडे कोणत्याही बाजूने मात करण्याचा आत्मविश्वास आणि विश्वास आहे. आमच्यासाठी हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे. आम्हाला माहितीय की आमच्याकडे कौशल्ये आहेत, ती फक्त कठीण परिस्थिती, दबाव परिस्थिती हाताळण्याबद्दल आहे, असे राशिदने स्पष्ट केले.
आम्हाला काही सुधार करावे लागतील विशेष करुन मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये. आमच्यासाठी हे नेहमीच शिकत असते आणि आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आम्ही अधिक कठोर मेहनत करून खास करुन बॅटिंगमध्ये कमबॅक करतो, असे राशिदने म्हटले.





