T20 World Cup 2024 : युगांडाचा पापुआ-न्यू-गिनीविरुद्ध निसटता विजय…

T20 World Cup 2024 ( PNG vs UGA) : टी20 विश्वचषक 2024 चा नववा सामना गुरुवारी पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युगांडाने 10 चेंडू शिल्लक असताना तीन गडी राखून विजय मिळवला. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात युगांडाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला पापुआ न्यू गिनी संघ 19.1 षटकात केवळ 77 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे युगांडाला 78 धावांचे सोपे लक्ष्य होते, मात्र युगांडाने हे लक्ष्य गाठण्यासाठी 18.2 षटकं घेताना सात गडी गमावले आणि 78 धावा करत सामना जिंकला.
Historic moment for Uganda as they record their first win in Men’s #T20WorldCup 🤩#PNGvUGA ➡ https://t.co/TvZ9yZ69SG pic.twitter.com/oNw63IadEo
— T20 World Cup (@T20WorldCup) June 6, 2024
युगांडाकडून रियाजत अली शाहने 56 चेंडूत सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 1 चौकार मारला. याशिवाय जुम्मा मियागीने 16 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त युगांडाच्या अन्य 7 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. रियाजत अली शाहनं जरी संथ खेळी केली असली तर ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली आणि युगांडाचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अल्पेशने आठ धावा, दिनेशने शून्य, केनेथने (नाबाद) सात धावा केल्या. ब्रायन खाते न उघडता नाबाद राहिला. पापुआ न्यू गिनी कडून अली नाओ आणि नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर चैड सोपर आणि असद वाला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो…
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यू गिनीची सुरुवात खूपच खराब झाली होती. या संघाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत होते. सलामीवीर असद वालाने शून्य धावा केल्या. तर टोनी उरा 1 धाव करून माघारी परतला. पापुआ न्यू गिनीसाठी हीरी हीरीने 19 चेंडूत 15 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. तर लिगा सियाकाने 17 चेंडूत 12 धावा केल्या. किपलिन डोगारियाने 20 चेंडूत 12 धावा केल्या. मात्र याशिवाय एकाही फलंदाजाला महत्त्वाचे योगदान देता आले नाही. पापुआ न्यू गिनीचे 8 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. त्यामुळे पापुआ न्यू गिनी संघाला केवळ 77 धावा करता आल्या.
T20 World Cup 2024 : युगांडाच्या गोलंदाजाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी केला विश्वविक्रम…
फ्रँको एनसुबुगाची दमदार गोलंदाजी…
युगांडाच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर अल्पेश रामाजानी, कॉस्मेस येवुथा, जुमा मियागी आणि फ्रँक एनसुबुगा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ब्रायन मसाबाने 1 बळी घेतला. युगांडाच्या संघाची गोलंदाजी अप्रतिम होती. युगांडाचा संघाचा गोलंदाज फ्रँको एनसुबुगा (Frank Nsubuga) हा टी-20 विश्वचषक इतिहासातील सर्वात किफायतशीर चार षटकांचा स्पेल करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 4 धावा देत 2 बळी घेतले.





