T20 World Cup – टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४०वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात ऍडिलेड येथील ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभवाचा धक्का दिला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने महत्वाचा सामना गावल्याने पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जागा मिळवणे खूपच सोपे बनले होते. बांगलादेशचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित झाले. त्यामुळे पाकिस्तानचा सेमीफायनल सामना आता न्यूझीलंडशी खेळला जाणार आहे.
#T20WorldCup | सूर्यकुमार यादव म्हणाला,”रोहितने मला मनसोक्त फलंदाजी करण्याचं स्वातंत्र्य दिलंय”
पाकिस्तानने ( T20 World Cup ) सेमीफायनामध्ये प्रवेश केल्यानंतर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. प्रसादने ट्विटमध्ये लिहिले की, “भगव्या रंगाने पाकिस्तानला सेमीफायनामध्ये पोहोचले आहे”. महत्वाचं म्हणजे नेदरलँड्स संघाच्या जर्सीचा रंग भगवा आहे. याच संधीचा फायदा घेत व्यंकटेश प्रसादने पाकिस्तानला चिमटा घेतल्याचे दिसत आहे.
बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली होती. बाबर आझमने २५ धावा तर मोहम्मद रिझवानने ३२ केल्या होत्या.
So Bhagwa has helped Pakistan reach the semis 😛
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) November 6, 2022
टी-२० विश्वचषकाच्या ( T20 World Cup ) सेमीफायनल सामान्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानची लढत न्यूझीलंडशी होणार असून भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड सामना ९ नोव्हेंबरला बुधवारी खेळला जाईल. तर भारत-इंग्लंड सामना १० नोव्हेंबरला गुरुवारी खेळला जाईल.