T20 World Cup 2024 : आठ संघांमध्ये होणार 12 सामने..! सुपर-8 मध्ये कोण-कोणाशी अन् कधी भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक…

T20 World Cup 2024 (Super 8 Schedule) : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या सुपर 8 साठी सर्व आठ संघ अंतिम झाले आहेत. बांगलादेश हा सुपर 8 मध्ये प्रवेश घेणारा शेवटचा संघ आहे. आता आठ संघांमध्ये एकूण 12 सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर टी-20 विश्वचषकाचे उपांत्य आणि अंतिम सामने आयोजित केले जातील. भारत आणि यूएसए सोबतच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत.
सुपर 8 चे सामने 19 जूनपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 20 जून रोजी सामना होणार आहे. सुपर 8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात चार संघ आहेत. भारत गट 1 मध्ये आहे. त्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचाही समावेश आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांना गट 2 मध्ये ठेवण्यात आले आहे.
Super Eight groups are locked 🔒
Who are the favourites to make it to the #T20WorldCup 2024 semi-finals? 👀 pic.twitter.com/fe0OkJpx2t
— ICC (@ICC) June 17, 2024
सुपर 8 मध्ये टीम इंडियाचे तीन सामने…
प्रत्येक संघ सुपर-8 फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांनी 3-3 सामने खेळल्यानंतर, दोन्ही गटात जे संघ टॉप-2 मध्ये असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.
भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये 20 जून रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना सेंट लुसिया येथे होणार आहे. हा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
सामन्यांची वेळ काय असेल..?
सुपर-8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जातील. सुपर-8 चे काही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता तर काही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवले जातील. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवले जातील.
The schedule for the Super Eight stage of the #T20WorldCup has now been finalised 👀
Details ➡ https://t.co/K8gXT3Qngg pic.twitter.com/UPYqnbo3mx
— ICC (@ICC) June 17, 2024
टी-20 विश्वचषक 2024 : सुपर-8 चे पूर्ण वेळापत्रक…
अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 19 जून, रात्री 8 वाजता, अँटिग्वा
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज : 20 जून, सकाळी 6 वाजता, सेंट लुसिया
अफगाणिस्तान विरुद्ध भारत : 20 जून, रात्री 8 वाजता, बार्बाडोस
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश : 21 जून, सकाळी 6 वाजता, अँटिग्वा
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 21 जून, रात्री 8 वाजता, सेंट लुसिया
यूएसए विरुद्ध वेस्ट इंडीज : 22 जून, सकाळी 6 वाजता, बार्बाडोस
T20 World Cup 2024 (Super-8) : …तर निकाल निश्चित करण्यासाठी 5-5 षटकांचा होणार सामना
भारत विरुद्ध बांगलादेश : 22 जून, रात्री 8 वाजता, अँटिग्वा
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 23 जून, सकाळी 6 वाजता, सेंट व्हिन्सेंट
यूएसए विरुद्ध इंग्लंड : 23 जून, 8 वाजता, बार्बाडोस
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 24 जून, सकाळी 6 वाजता, अँटिग्वा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत : 24 जून, रात्री 8 वाजता, सेंट लुसिया
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश : 25 जून, सकाळी 6 वाजता, सेंट व्हिन्सेंट





