Ayush Mhatre Record : आयुष म्हात्रेने वादळी अर्धशतक ठोकत रचला इतिहास! चेपॉकवर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Ayush Mhatre Record : चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर १८ वर्षीय आयुष म्हात्रे याने आपल्या फलंदाजीने इतिहास रचत दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

Ayush Mhatre Record Fifty Chepauk IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील लढतीत एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर १८ वर्षीय आयुष म्हात्रे याने आपल्या फलंदाजीने इतिहास रचत दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
चेपॉकच्या ऐतिहासिक मैदानावर आज आयुष म्हात्रे नावाच्या युवा फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला. पंजाब किंग्सविरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. संजू सॅमसन अवघ्या १४ धावांवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आयुषने सुरुवातीला संयम दाखवला, पण एकदा स्थिरावल्यावर त्याने पंजाबच्या गोलंदाजांची पिसं काढली. ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी करत दमदार सुरुवात करुन दिली.
चेपॉकचा सर्वात तरुण ‘अर्धशतकवीर’ –
What a coincidence!
Ayush Mhatre scored the exact same runs off the same number of balls as his idol, Rohit Sharma.
📸: JioStar#fblifestyle #rohitsharma #AyushMhatre #ipl2026 pic.twitter.com/1qSkHIpD6O
— CricTracker.02 (@ZENbreaking) April 3, 2026
आयुष म्हात्रेने अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वयाच्या १८ वर्षे २६१ दिवस या काळात चेपॉक स्टेडियमवर आयपीएल अर्धशतक ठोकणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम सुरेश रैनाच्या (२१ वर्ष १४८ दिवस) नावावर होता. आयुषने आपल्या ७३ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार लगावले, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १६९.७७ इतका जबरदस्त होता. त्याच्या या खेळीमुळे अनुभवी खेळाडूही थक्क झाले आहेत.
पृथ्वी शॉशी बरोबरी, पण वैभव अजूनही पुढे –
आयपीएलच्या इतिहासात १९ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आयुषने आता पृथ्वी शॉची बरोबरी केली आहे. या यादीत राजस्थानचा वैभव सूर्यवंशी ३ अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे, तर पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे प्रत्येकी २ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानी आहेत.
१९ वर्षांखालील सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू:
- वैभव सूर्यवंशी: ३
- पृथ्वी शॉ: २
- आयुष म्हात्रे: २
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, सीएसकेने २० षटकांत पाच गडी गमावून २०९ धावा केल्या. आयुष म्हात्रेने सर्वाधिक ७३ धावा केल्या. पंजाबकडून विजयकुमार विशाखने दोन बळी घेतले, तर झेवियर बार्टलेट, मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली





