Syria War – सीरियातील लताकिया आणि टार्टस येथे लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारामुळे २ दिवसांत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २०११ मध्ये झालेल्या सीरियन यादवी युद्धानंतरचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा आहे. सीरियातील युद्धावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थे ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ने ही माहिती दिली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांनी अलेवी मुस्लिम समुदायातील ७४५ हून अधिक लोकांना ठार मारले आहे. त्यापैकी बहुतेकांना फाशी देण्यात आली आहे. याशिवाय, असद समर्थक १४८ सैनिकही मारले गेले आहेत. तसेच, या हिंसाचारात १२५ सुरक्षा कर्मचारीही मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर बशर देश सोडून रशियाला पळून गेला. यानंतर, हयात तहरीर अल-शाम या दहशतवादी संघटनेने सीरियातील सत्ता हाती घेतली.