Most Loyal Players : IPL चे ‘एकनिष्ठ’ शिलेदार! विराटसह ‘या’ ४ खेळाडूंनी कधीच बदलली नाही आपली टीम; कोण आहेत इतर खेळाडू?
Most Loyal Players : आयपीएलच्या या झगमगत्या दुनियेत आजही असे काही मल्ल आहेत ज्यांनी आपल्या फ्रँचायझीशी असलेली एकनिष्ठता कधीही सोडली नाही.

Most Loyal Players in IPL History : येत्या २८ मार्चपासून आयपीएल २०२६ चा (१९ वा हंगाम) थरार सुरू होत असून, या १८ वर्षांच्या प्रवासात अनेक खेळाडूंनी संघ बदलले, काहींनी निवृत्ती घेतली, तर काही लिलावात विकले गेले. मात्र, या झगमगत्या दुनियेत आजही असे काही मल्ल आहेत ज्यांनी आपल्या फ्रँचायझीशी असलेली एकनिष्ठता कधीही सोडली नाही.
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीग असली तरी, इथे खेळाडूंची अदलाबदल होणे ही सामान्य बाब आहे. परंतु, विराट कोहली, सुनील नरेन, जसप्रीत बुमराह आणि किरोन पोलार्ड या चार नावांनी आयपीएलच्या इतिहासात एकनिष्ठेची नवी व्याख्या लिहिली आहे. आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि केकेआर या तीन संघांनी आपल्या या हिऱ्याला कधीही इतर संघात जाऊ दिले नाही.
१. विराट कोहली (RCB): एकनिष्ठेचा राजा
😂🔥 That’s hilarious! Virat Kohli’s intensity captured perfectly! 🤑 #Viratkohli #IPL2026 #RCB
pic.twitter.com/gU21dagpGI— Cricket Insights (@expert88135) March 21, 2026
आयपीएलमध्ये एकनिष्ठेचा विषय निघाल्यास विराट कोहलीचे नाव सर्वात वर येते. २००८ च्या पहिल्या हंगामापासून आजपर्यंत विराट केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडूनच खेळला आहे. सलग १८ हंगाम एकाच संघासाठी खेळणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.
२. सुनील नरेन (KKR): कोलकाताचा आधारस्तंभ
वेस्ट इंडिजचा दिग्गज फिरकीपटू सुनील नरेन गेल्या १४ हंगामांपासून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा महत्त्वाचा भाग आहे. १५ व्या हंगामातही तो जांभळ्या जर्सीमध्येच दिसणार आहे. केकेआरने त्याला कधीही लिलावात जाऊ दिले नाही.
३. किरॉन पोलार्ड (MI): मुंबईचा हुकुमी एक्का
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरोन पोलार्ड २०१० मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आणि २०२२ पर्यंत सलग १३ हंगाम त्याने याच संघाची सेवा केली. निवृत्तीनंतरही तो कोचिंगच्या माध्यमातून मुंबईशीच जोडलेला आहे.
४. जसप्रीत बुमराह (MI): लिलावापासून दूर
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २०१३ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला. गेल्या १३ हंगामात त्याने कधीही दुसरी जर्सी घातली नाही. विशेष म्हणजे, २०१३ च्या लिलावानंतर बुमराह पुन्हा कधीही लिलावाच्या रिंगणात उतरला नाही, कारण मुंबईने त्याला प्रत्येक वेळी रिटेन केले आहे.





