Swapnil Joshi : ‘सॉरी सॉरी…’! बाळ रडताच स्वप्नील जोशीने नाटक थांबवलं; ‘त्या’ कृतीने होतोय कौतुकाचा वर्षाव
Swapnil Joshi : नाटक सुरू असताना आलेला व्यत्य स्वप्नील जोशीने शांतपणे आणि संयमाने हाताळला.

Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नाटक सुरू असताना बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे अभिनेता स्वप्निल जोशीने नाटक काही वेळासाठी थांबवलं. संबंधितांना बाळाला बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली. यावेळी स्वप्नीलने ज्या पद्धतीने हा प्रसंग हाताळला त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
नेमकं घडलं काय?
‘लग्नपंचमी’ या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधील कोणाचं तरी बाळ रडू लागलं. एक दोन वेळा दुर्लक्ष केलं मात्र सतत रडणाऱ्या बाळाचा आवाज स्वप्नील जोशीला असह्य झाला, आणि त्याने हलकासा पॉझ घेत संबंधितांना बाळाला बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली. नाटकातील संवाद सुरू असताना स्वप्निल ‘एक मिनिट, सॉरी सॉरी… ‘ म्हणत संबंधित प्रेक्षकांशी संवाद साधतो.
View this post on Instagram
‘या बाळाला आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो का ? त्यावर प्रेक्षकही सॉरी म्हणतात. त्यावर स्वप्निल म्हणतो ‘काही हरकत नाही, सगळ्यांचाच रसभंग होतोय. ‘ तेवढ्यात बाळ पुन्हा रडू लागतो. बाळालाही तो संबोधून ‘ओ बाळा ‘ म्हणत त्यालाही आवडतं नाटक बघायला ‘ असं मजेशीरपणे म्हणतो.
यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला होता. परंतु नाटक सुरू असताना आलेला व्यत्य त्याने शांतपणे आणि संयमाने हाताळला. विशेषतः त्या बाळाच्या आई-वडिलांचा कुठेही अपमान न होता त्याने ज्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला हे पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाची रंगभूमीवर सध्या प्रचंड चर्चा आहे. हे नाटक मधुगंधा कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आहे.
हेही वाचा:




