आवडती जोडी पुन्हा एकत्र! ‘मुंबई-पुणे-मुंबई ४’ ची घोषणा; पाहा व्हिडीओ

Mumbai Pune Mumbai 4 : २०१० मध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सिनेमात एकत्र दिसले. या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या सिनेमातील स्वप्निल- मुक्ताची जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. यानंतर मुंबई- पुणे-मुंबई २ प्रदर्शित झाला. याही सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई ३’ला सुद्धा प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा पुढचा भाग मुंबई पुणे मुंबई ४ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा : recipes: पुलाव आणि बिर्याणी खाऊन कंटाळलात? मग करा काहीतरी हटके… बनवा मसाला वांगी भात!
मराठी सिनेसृष्टीत आपल्या वेगळ्या आशयाच्या सिनेमांसाठी दिग्दर्शक सतीश राजवाडे ओळखले जातात. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रेमाची गोष्ट २ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमासोबत त्यांनी मुंबई पुणे मुंबई ४ ची घोषणा करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
१५ वर्षांपूर्वी सुरु झाला एक रोमँटिक प्रवास’, ‘नात्यांची गोडवा वाढवायला पुन्हा येतोय’ अशी सुंदर टॅगलाईन सतीश राजवाडे यांनी मुंबई पुणे मुंबई ४ सिनेमाची घोषणा करताना दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. मात्र, हा सिनेमा रिलीज कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. चौथ्या भागात गौरी-गौतमच्या आयुष्याच्या कोणत्या पैलूवर भाष्य केले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
हेही वाचा : राजकीय समीकरणे बदलणार अन् भाजपला ‘बळ’ मिळणार! माजी खासदार हिना गावित यांची पुन्हा घरवापसी





