Amruta Khanvilkar : अॅक्शन सीन करताना जखमी झाली होती अमृता; सांगितली ‘ती’ घटना म्हणाली “मी पहिल्यांदा…”
Amruta Khanvilkar : अनेकदा हे अॅक्शन सीन्स करणे खूप जोखमीचे समजले जाते. हे करताना दुखापत होण्याची शक्यता असते.
Amruta Khanvilkar : बॅालिवूड चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्री अॅक्शन सीन्स करताना दिसतात. मात्र, असा एक काळ होता की फक्त पुरुष कलाकार अॅक्शन सीन्स करताना दिसत होते. आता मोठा बदल झाला असून, महिला कलाकारही अॅक्शन अवतारात दिसतात.
बॅालिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री आलिया भट, दीपिका पदुकोण किंवा कतरिना कैफ अॅक्शन सीन्समधून दिसल्या आहेत. अनेकदा हे अॅक्शन सीन्स करणे खूप जोखमीचे समजले जाते. हे करताना दुखापत होण्याची शक्यता असते.
‘राझी’ आणि ‘मलंग’ सारख्या चित्रपटांमध्ये, तसेच ‘लुटेरे’ आणि ’36 डेज’ सारख्या वेबसीरिजमध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा ॲक्शन करताना दिसली आहे.
मात्र, अॅक्शन सीन करताना ती जखमी झाली होती. याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखत सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिची तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेबसिरीज रिलीज झाली होती. या सिरीजमधील अॅक्शन सीन करताना ती जखमी झाली असल्याचे तिने सांगितले.
नेमकं काय घडलं ?
“ॲक्शन करण्यापूर्वी दुखापत टाळण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं, पण मी जखमी झाले आहे. मी पहिल्यांदा ‘तस्करी’ या वेब सीरिजमध्ये काम केलं, जिथे मला एका स्टंटमॅनला ठोसा मारायचा होता. हे करत असताना मी आणि स्टंटमॅन दोघेही जखमी झालो होतो. त्यामुळे आता मला माहित आहे की दुखापत किती गंभीर असू शकते.
एका अभिनेत्रीसाठी कॅमेऱ्यासमोर ॲक्शन करणे हा एक अनोखा अनुभव असतो. जेव्हा एखादा दिग्दर्शक तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्हाला ॲक्शनसाठी निवडतो, तेव्हा तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. आता मला ॲक्शनसाठी खूप तयार झाल्यासारखं वाटतं, असे अमृता म्हणाली.
अमृताने या सिरिजच्या दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. ती म्हणाली, “दिग्दर्शक नीरज पांडे सरांनी त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनेत्रींना नेहमीच अप्रतिम ॲक्शन सीन्स दिले आहेत. जर तुम्ही अभिनेत्री तापसी पन्नूची ‘नाम शबाना’ आणि ‘बेबी’ चित्रपटांमधील ॲक्शन पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की ते त्यांच्या अभिनेत्रींना मर्यादा तोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ॲक्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.” अशा शब्दांत तिने दिग्दर्शक नीरज पांडे यांचे आभार मानले आहे.
तस्करी: द स्मगलर्स वेब
ही वेबसिरीज याच वर्षी २०२६ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ही एक क्राईम-थ्रिलर वेबसिरीज आहे, जी कस्टम अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिरीजमध्ये इमरान हाश्मी (कस्टम ऑफिसर अर्जुन मीणाच्या भूमिकेत), शरद केळकर, अमृता खानविलकर, झोया अफरोज, नंदीश संधू आणि जमील खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन नीरज पांडे आणि राघव जयरथ यांनी केले आहे.
हेही वाचा : Asaduddin Owaisi: बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींचा सवाल






