पुणे | मासळीच्या भावातील तेजी टिकून ; चिकन, मटणासह अंड्यांचे भाव स्थिर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशाच्या पूर्व किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात सर्व प्रकारच्या मासळीची आवक होत आहे. बाजारातील मागणीनुसार पुरवठा होत असल्याने मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील भाव टिकून आहेत. याखेरीज मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे चिकन, मटण आणि अंड्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील मासळी बाजारात रविवारी (दि. १४) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन- अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) – पापलेट : कापरी : १५००, मोठे : १५००, मध्यम : ११००-१२००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ७००-८००, सुरमई : लहान ७००-८००, मध्यम ९००-१०००, मोठी सुरमई ११००, रावस : ७००-९००, घोळ : ७००-८००, करली : ४००-४४०, करंदी (बिगर सोललेली) : २००-२४०,
पाला : लहान ८००-९००, मोठा १०००-१५००. वाम : पिवळी ६००-७००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : ३००-४००. कोळंबी : लहान २००-२८०, मोठी : ३२०-४८०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २८०-४८०, राणीमासा : २८०-३६०,
खेकडे : २८०-४००, चिंबोर्या : ७००-८००. खाडीची मासळी : खापी : ३२०-३६०, नगली : ५००-६००, तांबोशी : ५००-६००, लेपा : २४०-२८०, बांगडा : २८०-३२०, शेवटे : लहान २४०-२८०, मोठे शेवटे : ३००-३६०, बेळुंजी : १६०-२००, तिसर्या : २००-२४०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ३००-३२०,
शिवडा : १८०-२००, खवली : २४०-२८०, आम्ळी : १४०-१८०, खेकडे : ३५०-४००, चिलापी : १००-२००, वाम : ६००. मटण : बोकड : ७४०, बोलाई : ७४०, खिमा : ७४०, कलेजी : ७८०, चिकन : २४०, लेगपीस : ३००, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १०४०, डझन १३०, प्रतिनग ११. इंग्लिश (शेकडा) ५९५, डझन ८४, प्रतिनग ७.



