Pune : मासेमारी बंद झाल्याने मासळीचे दर दुप्पट

पुणे : पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी मासेमारी बंद करण्यात आली आहे. मासेमारी बंद झाल्याने मार्च-एप्रिल महिन्यांच्या तुलनेत मासळीचे दर दुप्पट वाढल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान मागणी आणि पुरवठ्यातील समतोलमुळे मटण आणि चिकनचे भाव स्थिर असल्याचे मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले.
गणेश पेठ येथील मासळी बाजारमध्ये मासळीची आवक घटली आहे. बाजारात आलेल्या मालामध्ये खोल समुद्राती मासळीची 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची 150 ते 200 किलो, नदीच्या मासळीची 1 ते 2 टन, आंध्र प्रदेश येथून रहु, कतला आणि सिलनची मिळून 15 ते 20 टन झाली आहे. पुढील दोन महिने मासेमारी बंद असल्याने मासळीची आवक घटणार आहे. त्याचा परिणाम म्हणून आणखी दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
मासळीचे दर पुढील प्रमाणे (प्रति किलोचे दर) : खोल समुद्रातील मासळी कापरी : 180-200, मोठे : 1600-1800, मध्यम : 1100-1200, लहान : 1000-1200, भिला : 800 ते 900, हलवा : 800-900, सुरमई : 1200-1400, रावस : लहान : 1000-1200, मोठा : 1500-1600, घोळ : 1000-1200, करली : 500-550, करंदी : 500-550, भिंग : 400-500, पाला : 1500-2000, वाम : 1600-1500, ओले बोंबिल : 400-500. कोळंबी : लहान : 240-320, मोठी : 400-700, जंबोप्रॉन्स : 1500-1600, किंगप्रॉन्स : 800-900, लॉबस्टार : 2000-2200, मोरी : 400-500, मांदेली : 160-200, राणीमासा : 300-350, खेकडे : 400-450, चिंबोर्या : 600-800.
खाडीची मासळी : सौंदाळे : 300-400, खापी : 300 – 400, नगली : 700-800, तांबोशी : 600-700, पालू : 400-450, लेपा : 300-350, बांगडा : लहान : 600, मोठा : 350-400, शेवटे : 300-400, पेडवी : 100-150, बेळुंजी : 200-250, तिसर्या : 300-350, खुबे : 100-150, तारली : 200-250.
नदीची मासळी : रहु : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-500, शिवडा : 250, खवली : 250-300, आम्ळी : 120-180, खेकडे : लहान : 250, मोठे : 400-500, वाम : 600-650. मटण : बोकडाचे : 780, बोलाईचे : 780, खिमा : 780, कलेजी : 820. चिकन : 230, लेगपीस : 280, जिंवत कोंबडी : 150 बोनलेस : 330. अंडी गावरान : शेकडा : 1120, डझन : 140, नग : 12, इग्लिंश : शेकडा : 580, डझन : 84, नग : 7.


