Pune : मासळीचे भाव या आठवड्यातही तेजीतच

पुणे : येथील बाजारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात मासळी दाखल होत आहे. त्यामुळे मासळीचे तेजीतील भाव कायम आहेत. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने इंग्लिश अंड्यांच्या भावात शेकड्यामागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे चिकन, मटण आणि गावरान अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 2) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो एवढी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव रुपयांत)- पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1500, मध्यम : 1200-1400, लहान : 900-1000, भिला : 800-900, हलवा : 600-700, सुरमई : लहान 480-750, मोठी 900 – 1000, रावस : लहान 700-900, मोठा 1000-1200, घोळ : 800-900, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 480, भिंग : 360, पाला : 1000-1400, वाम : पिवळी 1200, काळी : 480-500, ओले बोंबील : 280-350. कोळंबी : लहान : 200-280, मोठी : 400-700, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 280-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 200-240, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या: 700-800. खाडीची मासळी : सौंदाळे : 200-280, खापी : 200-280, नगली : 650, तांबोशी : 500-550, पालू : 250-300, लेपा : 250-300, बांगडा : 200-250, शेवटे : 200-250, पेडवी : 100-120, बेळुंजी : 200-250, तिसर्या : 300-350, खुबे : 120-140, तारली : 160-200. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160-180, मरळ : 280-600, शिवडा : 200, खवली : 200-250, आम्ळी : 140-160, खेकडे : 300-400, चिलापी : 120-180, वाम : 600. मटण : बोकडाचे 760, बोलाईचे 760, खिमा 760, कलेजी 800. चिकन 180, लेगपीस 250, जिवंत कोंबडी 120, बोनलेस 280. अंडी : गावरान (शेकडा) 1020, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 510, डझन 72, प्रतिनग 7 रुपये.





