Pune : जीबीएसमुळे चिकनच्या मागणीसह दरही घटले

पुणे : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात आवक असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. जीबीएसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चिकनच्या मागणीत वीस ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी दरातही किलोमागे २० ते ३० रुपयांनी घसरण झाली आहे. गावरान अंड्यांचे दरही शेकड्यामागे 40 ते 50 रुपयांनी उतरले असून, मटणाचे दर स्थिर आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 23) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची 400 किलो आणि नदीच्या मासळीची एक ते दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कतला आणि सिलनची सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1500-1600, मध्यम : 1200-1400, लहान : 900-1100, भिला : 800-900, हलवा : 650-750, सुरमई : लहान 600-700, मोठी 1000 – 1200, रावस : लहान 750-850, मोठा 1000-1200, घोळ : 800-1000, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 440-480, भिंग : 300-400, पाला : मध्यम 900-1000. मोठा 1400 -1500, वाम : पिवळी 1000-1200, काळी : 400-480, ओले बोंबील : 300-350. कोळंबी : लहान : 200-320, मोठी : 400-500, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-800. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 180-200, नगली : 500-600, तांबोशी : 500-550, तिसर्या : 300-350. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-200, मरळ : 400-600, शिवडा : 220-300, खवली : 250- 300, खेकडे : 300-400, चिलापी : 100-180, वाम : 500-600.
मटण : बोकडाचे 760, बोलाईचे 760, खिमा 760, कलेजी 800. चिकन 180, लेगपीस 250, जिवंत कोंबडी 120, बोनलेस 280. अंडी : गावरान (शेकडा) 1020, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 490, डझन 72, प्रतिनग 6.





