आमदारांचं निलंबन रद्द : फडणवीसांच्या ‘लोकशाही वाचली’ विधानाला उर्मिला यांचं चोख प्रत्युत्तर

मुंबई : विधानसभेत गैवर्तन केल्याच्या आरोपारून विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी भाजपच्या बारा आमदारांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबीत करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सुप्रिम कोर्टाने घटनाबाह्य ठरवून रद्द बातल केला आहे, त्यामुळे या आमदारांना मोठाच दिलासा मिळाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला. त्याला खासदार उर्मिला मातोंडकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांनी म्हटलं होतं की, राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना बेकायदेशीरपणे निलंबित करण्यात आले होते. तो निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा लोकशाही वाचवणारा व ऐतिहासिक स्वरूपाचा आहे त्याचे आम्ही स्वागत करतो.
अभिनंदन!आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा..
पण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा.इथे फक्त ५०लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे https://t.co/mMu0IjbKnj— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 28, 2022
यावर ट्विट करून उर्मिला यांनी म्हटलं की, “अभिनंदन!आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असे ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.





