नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांची दिल्ली भाजपच्या लीगल सेलच्या सहसंयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या घडामोडीकडे बांसुरी यांची सक्रिय राजकारणातील एन्ट्री म्हणून पाहिले जात आहे.
बहन सुश्री बांसुरी स्वराज जी को नये दायित्व की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।@JPNadda @BansuriSwaraj @BJP4Delhi pic.twitter.com/jkvvYQnEtA
— Virendraa Sachdeva (@Virend_Sachdeva) March 26, 2023
पेशाने वकील असणाऱ्या बांसुरी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्या याआधीही कायदेशीर बाबींमध्ये भाजपला सहाय्य करत होत्या. आता त्यांच्यावर औपचारिकपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी त्यांची नियुक्ती केली. तसेच, त्यांना भाजपला आणखी मजबूत बनवण्याच्या उद्देशातून योगदान देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बांसुरी यांनी सचदेवा यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानले.