व्यावसायिक शत्रुत्वामुळे सुशांतची आत्महत्या

मुंबई -व्यावसायिक शत्रूत्वामुळे अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याची शक्यता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केली आहे. या प्रकरणात काही नावे समोर आली आहेत. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत त्यांची नावे गुप्तच ठेवली जातील, असेही त्यांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 30 जणांची चौकशी करण्यात आली आहे. अनेकांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांनी जोर धरला होता. तसेच अनेकांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. मात्र, पोलीसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून येत्या काळात आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे.
ज्या व्यक्तींवर संशय आहे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यापुढेही तपास याच पद्धतीने सुरू राहिल, असेही त्यांनी सांगितले. व्यावसायिक वादातून सुशांतने आत्महत्या केल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून त्याची खातरजमा केली





