Suryakumar Yadav Video : ‘खेळाडू असावा तर सूर्यासारखा..!’ चाहत्याकडे पेन-कागद नव्हता, तरी स्वत: कारमधून आणून दिला ऑटोग्राफ, पाहा VIDEO
Suryakumar Yadav Video : सूर्याच्या अनोख्या दिलदारपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Suryakumar Yadav Kind Gesture Viral Video Autograph Fan Without Pen Paper Pro Govinda : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली जगज्जेतेपद मिळवून देणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या टीम इंडियाबाहेर असला, तरी त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. खराब फॉर्ममुळे कर्णधारपद आणि संघातून स्थान गमावल्यानंतर सूर्या आता पुनरागमनासाठी कसून सराव करत आहे. दरम्यान, मैदानाबाहेर सूर्याने दाखवलेल्या एका अनोख्या दिलदारपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
चाहत्याकडे पेन नव्हता अन् कागदही; सूर्याच्या कृतीने जिंकली लाखो मनं –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव आपल्या कारमधून खाली उतरताना दिसतो. त्याला पाहताच चाहते स्वागतासाठी आणि छायाचित्रे काढण्यासाठी धावून आले. एका चाहत्याने अत्यंत आशेने त्याच्याकडे ऑटोग्राफ मागितला; मात्र दुर्दैवाने त्या चाहत्याकडे पेन किंवा कागद काहीच नव्हते. चाहत्याची निराशा न करता, सूर्याने स्वतः परत कारमध्ये जाऊन स्वतःचा पेन आणि कागद आणला आणि त्यावर स्वाक्षरी करून त्या चाहत्याचे स्वप्न पूर्ण केले. या साधेपणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
‘प्रो गोविंदा’चा ब्रँड अॅम्बेसेडर; ‘घेऊन टाक’ गाण्यावर थिरकला
Suryakumar Yadav was asked for an autograph by a fan, but the fan didn’t have a pen or paper, so Surya took out his own pen and paper and gave him an autograph.❤️ pic.twitter.com/zMXkxUhGR3
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 1, 2026
सूर्यकुमार यादव नुकताच मुंबईत पार पडलेल्या ‘प्रो गोविंदा’ (Pro Govinda) स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुख्य आकर्षण ठरला होता. या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित राहिलेल्या सूर्याने गोविंदांसोबत ‘घेऊन टाक’ या गाण्यावर जोरदार ठेका धरला. मैदानावरील कठीण परिस्थितीला बाजूला ठेवून चाहत्यांमध्ये मिसळणारा त्याचा हा बिनधास्त अंदाज आणि नृत्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान गाजले होते.
११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव; ४ शतकांचा महाविक्रम!
सूर्यकुमार यादवची टी-२० कारकीर्द विक्रमी राहिली आहे. भारतासाठी ११३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत त्याने ३६.४ च्या सरासरीने ३२७२ धावा कुटल्या आहेत. यात ४ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश असून ११७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय ३७ एकदिवसीय सामन्यांत ७३६ धावा त्याच्या नावावर आहेत. सध्या तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये जोरदार घाम गाळत असून लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.





