ICC Rankings – आयसीसीने (ICC) ने टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भारताचा सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत पहिल्या स्थानी ताबा मिळवला आहे. या रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव ८६३ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे मोहम्मद रिझवान आता ८४२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
#INDvsBAN । राहुल अन् कोहलीच्या ‘विराट’ खेळीने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर
सूर्यकुमार यादव सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ अडचणीत असताना अवघ्या ४० चेंडूत त्याने ६८ धावांची खेळी शानदार परी खेळली होती. त्याचबरोबर २०२२ मध्ये टी-२० मध्ये शतकासह सर्वाधिक ९३५ धावा केल्या आहेत.
टी-२० आयसीसी क्रमवारीत न्यूझीलंडचा डेवेन कॉन्वे ७९२ अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा बाबर आझम ७८० तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम ७६७ अंकांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमध्ये पहिले स्थान मिळवणारा दुसराच भारतीय ठरला आहे. याअगोदर विराट कोहलीने हे स्थान मिळवलेले आहे.
𝐒𝐊𝐘 𝐇𝐈𝐆𝐇 🌟
Suryakumar Yadav is the new No.1 Men’s T20I batter 👑
More 👉 https://t.co/DBmrAmzBYB#T20WorldCup | @MRFWorldwide pic.twitter.com/MUAgXYJFfY
— ICC (@ICC) November 2, 2022
विराट कोहली पहिल्या दहांमध्ये
टी-२० विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत फायदा झाला आहे. कोहलीचे नावही टॉप १० मध्ये सामील झालेअसून तो ६३८ गुणांसह १०व्या क्रमांकावर आहे.