Suryakumar Yadav : नागपुरात सूर्याने झळकावलं ‘स्पेशल शतक’! भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू

Suryakumar Yadav 100th T20I Milestone : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज, २१ जानेवारीपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानात पाऊल ठेवताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणारा सूर्या हा भारत चौथा खेळाडू ठरला आहे.
सूर्याचे ‘विराट’ पाऊल; धोनीला टाकले मागे –
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत ९९ टी-२० सामने खेळले आहेत. आजचा नागपूरमधील सामना त्याच्या करिअरमधील १०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. या कामगिरीसह तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे, सूर्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (९८ सामने) याला आधीच मागे टाकले आहे.
𝗔 𝗹𝗮𝗻𝗱𝗺𝗮𝗿𝗸 𝗺𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 💯
Congratulations to Captain Surya Kumar Yadav as he is all set to play in his 1⃣0⃣0⃣th T20I for #TeamIndia 👏👏
Updates ▶️ https://t.co/ItzV352OVv#INDvNZ | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar pic.twitter.com/HljkT7jYdm
— BCCI (@BCCI) January 21, 2026
भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे खेळाडू:
- रोहित शर्मा: १५९ सामने
- विराट कोहली: १२५ सामने
- हार्दिक पंड्या: १२५ सामने
- सूर्यकुमार यादव: १०० सामने
हेही वाचा – Priya Saroj Video : रिंकू सिंगची होणारी पत्नी खासदार प्रिया सरोज अचानक मंचावर का झाली अस्वस्थ? पाहा VIDEO
१०० वा सामना आणि फॉर्मची चिंता –
सूर्यकुमार यादवसाठी हे ‘स्पेशल शतक’ वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचे आहे. २०२५ हे वर्ष सूर्यासाठी फलंदाज म्हणून निराशाजनक ठरले होते. मागील वर्षातील २२ डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यामुळे आपल्या १०० व्या सामन्यात मोठी खेळी करून फॉर्ममध्ये परतण्याचा सूर्याचा प्रयत्न असेल.
हेही वाचा – ICC Ultimatum BCB : मोठी बातमी! टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशची हकालपट्टी? ICC च्या बैठकीत झाला मोठा फैसला!
न्यूझीलंडविरुद्ध सूर्याची कामगिरी –
न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमारची आकडेवारी पाहता, भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. २०२१ ते २०२३ दरम्यान किवी संघाविरुद्ध त्याने ८ सामन्यांत ४७.३३ च्या सरासरीने २८४ धावा केल्या आहेत. यात नाबाद १११ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. एकूण टी-२० कारकिर्दीत सूर्याने ९९ सामन्यांच्या ९३ डावांत ४ शतके आणि २१ अर्धशतकांच्या मदतीने २,७८८ धावा केल्या आहेत.





