Priya Saroj Video : रिंकू सिंगची होणारी पत्नी खासदार प्रिया सरोज अचानक मंचावर का झाली अस्वस्थ? पाहा VIDEO

Priya Saroj uncomfortable moment video viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे त्याची होणारी पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जौनपुरमधील एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे प्रिया सरोज काही काळ अस्वस्थ आणि घाबरलेल्या दिसल्या, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील केराकत येथील एका दंगल (कुस्ती) स्पर्धेतील आहे. मछली शहर मतदारसंघाच्या खासदार प्रिया सरोज या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या मंचावर बसलेल्या असताना त्यांचा एक समर्थक तिथे पोहोचला.
Priya Saroj Faces Uncomfortable Incident!
#PriyaSaroj #RinkuSingh #UPNews #ViralVideo #BreakingNews #IndianPolitics #PublicEvent #SocialMediaNews pic.twitter.com/ZVwqWJyflE— YourDailyNews (@yourdailynews9) January 21, 2026
व्हिडिओमध्ये दिसते की, तो समर्थक प्रिया सरोज यांच्या जवळ येतो आणि त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसून त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. एका लोकप्रतिनिधीच्या नात्याने प्रिया सरोज यांनी हात जोडून त्याचे स्वागत केले. मात्र, खुर्चीवर बसल्यानंतर त्या समर्थकाच्या काही विचित्र हालचालींमुळे प्रिया सरोज यांच्या चेहऱ्यावर काही क्षणासाठी भीती आणि अस्वस्थतेचे भाव उमटले.
हेही वाचा – Rohit Sharma : एका महिलेने अचानक रोहित शर्माचा पकडला हात; इंदूरच्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
समर्थकाचे वागणे ठरले चर्चेचा विषय –
व्हायरल व्हिडिओनुसार, तो समर्थक ज्या पद्धतीने वागला, त्यामुळे प्रिया सरोज काही क्षणांसाठी अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. तथापि, व्हिडीओ पाहिल्यानंतर असेही समजते की, त्या समर्थकाने हे जाणीवपूर्वक केले नसावे, तर ते अनावधानाने घडले असावे. तरीही, भर मंचावर घडलेल्या या प्रकारामुळे खासदार महोदयांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून जात आहेत.
हेही वाचा – Gautami Naik : गौतमीच्या कामगिरीवर हार्दिक झाला फिदा ! थेट Video मेसेज पाठवला
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचे नाते –
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत. भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाला असून त्यांचे लग्न ठरले आहे. रिंकू सध्या मैदानावर आपल्या बॅटने कमाल दाखवत असताना, त्याची होणारी पत्नी राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.





